Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क ; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक

najarkaid by najarkaid
February 7, 2025
in जळगाव
0
जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क ; पोलीस आणि शिक्षण विभागाची झाली बैठक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी जिल्हाभरात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात 07 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचे आदेशावरून कॉपीमुक्त अभियानासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सह प्रशासनातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित मुख्याध्यापक यांना सूचना देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या सूचनांची काटेखोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त व आनंददायी वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान 500 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद राहतील याबाबत काळजी घ्यावी. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सह आरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले. परीक्षा केंद्राच्या आतील जबाबदारी हे केंद्र संचालकांचे असेल तर बाहेर होणारे गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी पोलीस दलाची असेल याबाबत देखील सूचित करण्यात आले. परीक्षा दरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी, सर्व केंद्र संचालक विद्यार्थी व पर्यवेक्षक यांना ओळखपत्र सक्तीचे करावे परीक्षेदरम्यान नियमांची उल्लंघन करणे तसेच गैरप्रकार करणे या बाबी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी सर्वांनी परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडण्यास पोलीस दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी उपस्थित मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना संबंधित करताना सर्व केंद्र संचालकांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची गंभीरता लक्षात घेऊन या कामकाजात कोणताही  हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. सर्व केंद्र संचालकांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी करून परीक्षा केंद्राचा अहवाल सादर करावा भरारी पथक स्वतंत्रपणे कार्यान्वित करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे आगामी परीक्षा काळात कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र भयमुक्त व कॉपीमुक्त राहतील या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पावले उचलले आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यासाठी दिलेल्या पत्राबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. यंदा जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 57487, व बारावीच्या परीक्षेसाठी 47667 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदरील परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार असून दहावीसाठी 145 तर 12 वी करिता 81 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचा निकाल जाहीर

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी नगराज पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us