जळगाव- राष्ट्रीय पशुधन अभियान योजने अंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयातर्फे जळगावातील शाहु महाराज सभागृह येथे येत्या 18 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शेळी पालन, कुकुट पालन, वराह पालन आणि वैरण विकास या विषयांवर माहिती देण्यात येणार आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यशाळा सुरु असणार आहे.
जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद हे या कार्यशाळेचे अध्यक्ष असणार आहे. नाशिक विभागाचे पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, जिल्हा कृषी अधिक्षक श्री कुरबान तडवी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रणधीर सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री प्रणव झा, तज्ञ प्रमुख व्याख्याते श्री विकास नरवाडे यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे.