राज्यभरातील (Mukhymantri mazi ladki bahin yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी सरकार फेर एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे.पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतेय ना? खात्री करण्यावर भर देणार आहे. या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की, नाही हे तपासणं हा आहे दरम्यान आतापर्यंत दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्याची माहीती आहे.
लाभार्थी प्रत्येक लाडक्या बहिणीला पडताळणी प्रक्रियेतून जावं लागणार (Ladki bahin yojana)
(Mukhyamantri mazi ladki bahin yojana) अंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल, योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या जवळपास दोन कोटी अर्जदारांना या तपासणी प्रक्रियेतून जावं लागणार आहे.ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांनाच सरकारी मदत मिळावी, असा प्रयत्न असणार आहे.प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत, त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांतून जावं लागेल. तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल…