Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्जत जामखेडमध्ये यावेळी भाजपा परिवर्तन घडविणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश

najarkaid by najarkaid
September 23, 2024
in Uncategorized
0
कर्जत जामखेडमध्ये यावेळी भाजपा परिवर्तन घडविणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये श्री. फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे,आ. सुरेश धस, आ. अतुल भातखळकर आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष श्री.बावनकुळे यांनी  श्री.राळेभात, श्री. काशीद आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

श्री. राळेभात यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जत,जामखेड मध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस रुजवली असे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजपाच्या परिवारात  आपण एकजुटीने काम करू अशी ग्वाहीही त्यांनी नव्याने प्रवेश करणा-या सर्वांना दिली. कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न महायुती सरकारने केल्याचे नमूद करत श्री. फडणवीस म्हणाले की पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी गोदावरी खो-यात आणण्यासाठी कॅबिनेटने मान्यता दिली आहे. याच्या कामाचे पहिले टेंडरही निघाले असून संपूर्ण जिल्हा जलमय करण्यासाठी महायुती सरकार वेगाने काम करत आहे. महायुती सरकारने शेतकरी हितार्थ घेतलेल्या निर्णयांचा ही त्यांनी उल्लेख केला.

यावेळी श्री. राळेभात म्हणाले की, मागच्या निवडणुकीत रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचे रान केले.कुकडीच्या पाण्यासह अनेक समस्या सोडवण्याची त्यावेळी केवळ आश्वासने दिली गेली मात्र पाच वर्षांत काहीच काम केले नाही. जाती जातीत दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले गेले. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात आले . त्यामुळे व्यथित होऊन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कर्जत जामखेडच्या विकासासाठी भाजपा मध्ये येण्याचा निर्णय घेतला असेही श्री. राळेभात यांनी सांगितले. भाजपा नेतृत्व जे काम सांगेल ते करू, पक्षातर्फे जो उमेदवार दिला जाईल त्याच्या पाठीशी उभे राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.श्री. राळेभात यांच्या सोबत कर्जत – जामखेड तालुक्यातील अनेक सरपंच, नगरसेवक,  पदाधिका-यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला.

­­

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत आता जागतिक स्तरावर बुद्धिबळातील एक प्रमुख शक्ती – अतुल जैन

Next Post

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी लॉटरी सोडत ; 761 जणांची निवड

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगावात ; जिल्हा दौरा पहा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थी लॉटरी सोडत ; 761 जणांची निवड

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us