Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

जळगाव ग्रामीणमध्येच नव्हे तर जिल्ह्यात संघटना टिकवून ठेवल्याचे मिळणार बक्षीस !

najarkaid by najarkaid
August 26, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण मतदारसंघात ज्या टपरी वाल्याला शिवसेनेने आमदार केलं, मंत्री केलं तरी देखील त्यांनी गद्दारी केली परंतु जनता गद्दारांसोबत नसून निष्ठावंत शिवसेनेसोबत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढविणारा उमेदवारच निवडून येणार आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी धरणगाव येथील मेळाव्यात केले होते. एवढेच नव्हे तर, आपल्या भाषणातून त्यांनी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा आपल्या भाषणातून उल्लेख केला. त्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर खासदार राऊत यांनी एकप्रकारे शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.

जळगाव ग्रामीणमध्येच नव्हे तर जिल्ह्यात टिकवून ठेवली संघटना !
शिवसेनेमध्ये गुलाबराव वाघ हे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पेक्षा सिनिअर होते. परंतू विधानसभेची उमेदवारी श्री. पाटील यांना सतत मिळत गेली. परंतू तरीदेखील गुलाबराव वाघ यांनी प्रामाणिकपणे काम करून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. पक्ष फुटीनंतरही वाघ यांनी आपली निष्टा ढासळू दिली नाही. अडचणीच्या काळात पक्ष संघटना जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात टिकवून ठेवली. विविध आंदोलन, प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीच्या काळात धावून जाण्यासाठी गुलाबराव वाघ यांची ख्याती आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणातही गुलाबराव वाघ यांचे नाव आले समोर !
जळगाव ग्रामीण मतदार संघातील प्रत्येक गावात गुलाबराव वाघ यांचा संपर्क आहे. लग्न, अंत्ययात्रेला ते हजर असतात. तसेच मागील २०/२५ वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ आणि विधानसभेची न मिळालेली संधीमुळे वाघ यांच्याविषयी मोठी सहानभूती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाने जळगाव जिल्ह्यात आपला एक गोपनीय सर्वे केला होता. त्यानुसार जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव,चाळीसगाव या ठिकाणी उमेदवार दिल्यास चांगली लढत दिली जाऊ शकते. जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव वाघ, पाचोरा-भडगावमध्ये वैशालीताई सूर्यवंशी तर चाळीसगावमध्ये उन्मेष पाटील यांचे नाव सर्वेक्षणातून समोर आले होते.

… म्हणून गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब !
धरणगावातील जी.एस कॉटन येथे नुकताच शिवसंवाद भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढविणारा उमेदवारच निवडून येणार आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच आपल्या भाषणातून त्यांनी दोन-तीन वेळेस गुलाबराव वाघ यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे गुलाबराव वाघ यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दरम्यान, गुलाबराव वाघ यांना उमेदवारी मिळाल्यास शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार आणि काटे की टक्कर या ठिकाणी बघावयास मिळणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे अभिनेत्री तन्वी मल्हाराने केले उद्घाटन

Next Post

वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

Related Posts

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Next Post
वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

वसंत मुंडेंना पत्रकार नेता म्हणून भविष्य-मंत्री चंद्रकांत दादा पाटील

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us