Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बलून बंधारे, पाडळसे धरणासह तापी खोरे योजनेसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची केंद्राकडे मोठी मागणी

najarkaid by najarkaid
July 11, 2024
in Uncategorized
0
धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सिंचन व पाणी पुरवठ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रकल्प असलेले गिरणा नदीवरील ७ बलून बंधारे, पाडळसे धरण व तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजनेसंदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना पत्र पाठविले आहे. ना.सी.आर.पाटील हे मुळ जळगाव जिल्ह्याचे असून त्यांचे ना. गुलाबराव पाटील यांच्याशी मित्रत्वाचे संबंध आहेत. यामुळे जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारे हे प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.

जळगांव जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून तीन मोठ्या प्रकल्पांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात ना.गुलाबवराव पाटील यांनी थेट केंद्र सरकारला साकडे घातले आहे. अमळनेर तालुक्यातील निम्मनमी (पाडळसे धरण) प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु शकतो. या प्रकल्पामुळे सहा तालुक्यांतील तब्बल २५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी ४ हजार ८५५ कोटी रुपयांची सु.प्र.मा. मंजूर असून मार्च २०२४ पर्यंत ८०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता उर्वरित ४ हजार ०५५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) मध्ये समावेश व्हावा, अशी मागणी, ना.गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

गिरणा नदीवर ७ बलून बंधारे

चाळीसगाव, भडगांव, पाचोरा व जळगाव या चार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनासह पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी दुर करणासाठी गिरणा नदीवर ७ बलून बंधारे बांधणे प्रस्तावित आहेत. यासाठी ३ हजार ३०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रकल्प शेतीला सुजलाम सुफलाम करेल, यामुळे यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या इनोव्हेटिव्ह स्किम अंतर्गत निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजना

जिल्ह्याच्या दृष्टीने तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजना हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या या योजनेसाठी १९ हजार २४४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या प्रकल्पामुळे रावेर, यावल व चोपडा भागातील खालवलेली भूजल पातळी वाढणार आहे. याचा फायदा लाखो शेतकऱ्यांना होईल. यामुळे प्रकल्पाला केंद्रीय पातळीवरुन तात्काळ मंजूरी देण्यात यावी, अशी विनंती ना.सी.आर.पाटील यांना करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्राला १९ टीएमसी व मध्यप्रदेशला १२ टीएमसी पाणी वापराबाबत संमती देखील झाली असून दोन्ही राज्यांनी यासाठी खर्चास संमती दर्शविली आहे. यात महाराष्ट्र 60 टक्के म्हणजे 11544 कोटी रुपये व मध्यप्रदेश 40 टक्के अर्थात 7700 कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही ना.गुलाबराव पाटील यांनी नमूद केले आहे.

जळगांव जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पांसाठी केंद्र शासनाची खालील प्रकल्पांना मदत अपेक्षित
1) निम्मनमी (पाडळसे धरण) ता.अमळनेर जिल्हा जळगाव –

• मोठा प्रकल्प ६ तालुक्यांना लाभ पोहचवणारा साधारण २५६९२ हे क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणारा.

मंजूर सु.प्र.मा. 4855 कोटी
खर्च मार्च 24 पर्यंत 800 कोटी
उर्वरित किंमत 4055 कोटी

मागणी..
प्रकल्पाचा समावेश PMKSY अंतर्गत व्हावा.

2.जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवर 07 बलून बंधारे प्रकल्प –

चार तालुक्यांचा फायदा चाळीसगाव, भडगांव, पाचोरा व जळगाव

अपेक्षित खर्च 3300 कोटी

मागणी:
अर्थसहाय केंद्राकडून – Innovative scheme PMkSY

3.तापी खोरे महाकाय पुर्नभरण योजना (मध्यप्रदेश व महाराष्ट्र) यांचा संयुक्त प्रकल्प –

योजनेची किंमत 19244 कोटी ( दरसूची सन 2022-23 )
रावेर यावल चोपडा भागातील खालवलेली भूजल पातळी वाढवणे

मागणी
दोन्ही राज्यांची पाणी वापराबाबत सहमती (महाराष्ट्र 19 Tmc मध्य प्रदेश 12 TMC)

दोन्ही राज्यांची खर्चाबाबत सहमती
(महाराष्ट्र 60 टक्के रुपये 11544 कोटी व मध्यप्रदेश 40 टक्के 7700 कोटी)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या पोलिसाने लिहिले पोलीस महासंचालकांवर पुस्तक

Next Post

बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील खासदार उन्मेशदादा पाटील यांचा एल्गार

Related Posts

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Next Post
बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील खासदार उन्मेशदादा पाटील यांचा एल्गार

बळीराजांच्या मागण्या मान्य होईपर्यंत महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरूच राहील खासदार उन्मेशदादा पाटील यांचा एल्गार

ताज्या बातम्या

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us