जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक पदी जी. जी. बलसाने यांची नियुकती करण्यात आली असून राज्य शासनाचे कार्यसन अधिकारी अनिल चौधरी यांनी आज दिनांक २४ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत. जळगावात बदलून येत असलेले जी. जी. बलसाने हे यापूर्वी नाशिक येथे विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक या पदावर कार्यरत होते. दरम्यान जळगाव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या रिक्त जागेवर जी. जी. बलसाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.