जळगाव,(प्रतिनिधी)- विरोधक नुसत्याच बाता करत असून रावेर लोकसभेसाठी मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान करीत आहेत. जळगाव जिल्हा दूध संघात दारुण पराभव केला असून आता तरी रावेर लोकसभा मतदार संघात उमेदवारी करण्यासाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका असा टोला भाजपाचे आमदार आ. मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. एकनाथराव खडसे यांचे नावं न घेता लगावला आहे,आज दिनांक १४ जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, मंत्री ना.गिरीश महाजन, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील,आ. किशोरअप्पा पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. लताताई सोनवणे,आ. चिमणआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, उमेश नेमाडे, आरपीआयचे अनिल अडकमोल, माजी आमदार दिलीप वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी आ. मंगेश चव्हाण यांनी पुढे बोलतांना सांगितले की, आगामी निवडणुका आपण एकत्रयेतं ताकदीने लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत त्यामुळं वरिष्ठ नेत्यांनी आदेश करायचे आणि आम्ही जिंकण्यासाठी काम करायचे हा संकल्प केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.