पाचोरा (प्रतिनिधी)-पाचोरा येथील रहिवाशी हल्ली मुक्काम जळगाव येथे रहिवासी असलेले जे.डी.सी.सी. बँकेचे माजी संचालक व पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन तथा चार्टर्ड अकाउंटंट चाणक्य बुद्धीचे अत्यंत हुशार व तज्ञ अभ्यासू वृत्तीचे अतुल संघवी यांची कन्या कु.खुशी संघवी हिने चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण होऊन आपल्या आई वडिलांचे नाव लौकीक केले.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तिने जीद्दीने अभ्यास करून सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिचे सर्वदूर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पाचोरा पीपल्स बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले तसेच संघवी परिवारातील दादाजी श्री रतनचंद स्वरूपचंद संघवी, श्री किशोर शेठ संघवी श्री ईश्वर सेठ संघवी, श्री संजय शेठ संघवी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील होणाऱ्या प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.