पुणे,(प्रतिनिधी)- पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचे पोलिसांनी पर्दाफाश केला असून पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर, या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून आरोपी पीडित चार तरुणींकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करुन घेत होती.
याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस हवालदार रेश्मा कंक यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विद्या मदन मंडले (रा. मार्केटयार्ड, पुणे), कौशल्या सहदेव लोंढे (वय-33 रा. वडगाव बु., पुणे) यांच्यावर आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 नुसार गुन्हा दाखल करुन कौशल्या लोंढे हिला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.2) सायंकाळी साडे चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर कारवाई केली.
बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये असलेल्या शिवांजली पंचकर्म क्लिनिक मसाज सेंटर येथे वेश्याव्यवसाय
सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. पंचकर्म मसाज सेंटरच्या नावाखालीहा वेश्याव्यवसाय सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या घटनेची पुष्टी केली आहे.त्यानंतर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले.पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक ढमढेरे करीत आहेत.