मुंबई,(प्रतिनिधी)- नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.अवकाळी,गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३,६००रुपये, बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल ३६ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.करण्याचे निर्देश महसूल व वन निकषाबाहेर जाऊन विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतला होता.राज्य सरकारने याची दखल घेत, बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधींच्या निकषाबाहेर जाऊन तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आता दिले आहेत.दरम्यान जिरायती शेतीसाठी ८,५०० रुपये ऐवजी १३,५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपयांऐवजी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २२,५०० रुपयांऐवजी आता३६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.