मुंबई,(प्रतिनिधी)- उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाली आहे,किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या वर गेला आहे. दिनांक ३१ रविवार रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १४ अंशांच्या वरच आहे. आज दिनांक १ जानेवारी रोजी राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे तर बुधवारपासून कोकणात व गुरुवारपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने वाऱ्यांची दिशा सध्या वायव्येकडे जाताना दिसत आहे, वाऱ्याची आणखी तीव्र होत असून येत्या काही तासांमध्ये या वाऱ्यांचं रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होऊन कोकण भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान पावसाची शक्यता असल्याने राज्यात सध्या थंडीचं प्रमाण कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.