जळगाव,(प्रतिनिधी)- भोईटेनगर येथील रेल्वे पुलाखाली लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतर सह उद्यान विकसित करण्याची मागणी भाजपाचे प्रवीण जाधव यांनी मुख्यरेल प्रबंधक मुंबई निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मध्य रेल्वे लाईन वरील बंद रेल्वे फाटक क्रमांक 147 वरील रिंग रोड ते कानळदा उड्डाणपूल नुकताच तयार होऊन लोकार्पण झाले आहे. सोबतच दोन मार्गीका असलेल्या डाव्या भुजेचे काम सुद्धा पूर्णत्वास येत आहे. त्याचेच खालील भागात म्हणजे भोईटे नगर येथे रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतरित करावे.अशी मागणी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक. प्रवीण जाधव यांनी मुख्यरेल प्रबंधक मुंबई यांच्याकडे केली आहे.
गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा
जळगाव रेल्वे लोहमार्ग पोलीस यांचे पोलीस मुख्यालय जे हल्ली पश्चिम रेल्वेच्या बाहेरील बाजूने शिवाजीनगर भागात आहे. हे पोलीसठाणे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे यांच्या मध्ये झाले तर सोयीचे होणार आहे. तसेच रेल्वेच्या वाणिज्य विभागातील महत्त्वाचे व सर्वात जास्त मिळकत असलेला व्यावसायिक घटक म्हणजे रेल्वे मालधक्का सुद्धा नेहमी साठी पोलिसांच्या नजरेत राहील पर्यायाने चोरीला आळा बसेल. व पुलाखाली असलेल्या तीस हजार चौरस फुट जागेवर अतिक्रमण होणार नाही. हल्ली व यापुढे हा भाग एकांतात असल्यामुळे येथे तृतीय पंथी व इतर लोक अनैतिक हालचाली करताना आढळून येतात.काही गर्दुल्ले येथे जमा होऊन अवैध धंदे सुद्धा सर्रासपणे करत असून अंधाराचा फायदा घेऊन गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता आहे.
इन्स्टाग्रामवर जुळलं सूत ; लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध केले प्रस्थापित, गुन्हा दाखल
म्हणून रेल्वे प्रशासनाने वरील सर्व बाबींचा विचार करता लवकरात लवकर जळगाव लोहमार्ग पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा. सोबतच लोहमार्ग पोलीस चौकी सोडून जेवढी जागा शिल्लक असेल तेवढ्या जागेमध्ये ओपन जिम व सुंदर असे प्रदूषण कमी होने उद्देशाने आपणउद्यान विकसित करावे.. अश्या मागणीचे निवेदन प्रवीण जाधव यांनी जीएम मुंबई, डी आर एम भुसावळ व म न पा आयुक्त जळगाव यांना निवेदन दिले आहे.
अयोध्या विमानतळाला देणार महर्षी वाल्मीकी यांचे नाव