पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची म्हणत .,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमदार नवाब मलिक यांच्या संदर्भात लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर खा.संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली असतांना विधानसभेत सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यामुळे वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे आता अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान विरोधकांनी सभागृहात यावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष केले. सभागृहा बाहेर देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेचे झोड उठवले असतांना देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा पवार यांना यांना या संदर्भात पत्र लिहलं. त्यावर आता खा. संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
खा.संजय राऊत काय म्हणाले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की,अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे पोपटलाल (किरीट सोमय्या) यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त नवाब मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…, असा टोला त्यांनी लगावला आहे.
हे पण वाचा….
सत्ता येते आणि जाते…; देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना लिहलं पत्र
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने विरोधकांनी फडणवीस यांच्यावर टिकेचे झोड उठवले आहे.