श्रीहरिकोटा- भारतीय अंतराळ संस्था(इस्रो) आज दुपारी 3:25 वाजता भारतीय उपग्रह रीसॅट-2बीआर1 आणि चार इतर देशांतील 9 सॅटेलाइट लॉन्च करणार आहे. हे प्रक्षेपण पीएसएलवी-सी48 रॉकेटमधून आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून होणार आहे. रीसैट-2बीआर1 रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट आहे. या सॅटेलाइटच्या माध्यमातून ढगांमध्ये आणि अंधारातही स्पष्ट फोटो घेता येऊ शकतो.
35 सेमी दूरवर असलेल्या दोन वस्तुंना ओळखेल
रीसॅट-2बीआर1 पाच वर्षे काम करेल. यामुळे रडार इमेजिंगचे तंत्र अधिक चांगले होणार आहे. यात 0.35 मीटर रिझोल्यूशनचा कॅमरा आहे, म्हणजेच हे 35 सेंटीमीटर दूरवरील दोन वस्तुंना ओळखू शकतो. या सॅटेलाइटमुळे सीमेवरील दहशतवादी हालचालींवर चोख लक्ष ठेवण्यास मदत मिळेल. यामुळे देशातील तिन्ही लष्कर आणि सुरक्षा दलाला मदत होईल. याचे वजन 628 किलोग्राम आहे. याला प्रक्षेपणाच्या 17 व्या मिनीटात जमिनीपासून 578 किलोमीटर उंच पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले जाईल.
सुरक्षा एजंसीला 4 रीसॅटची गरज
इस्रो रीसॅट सीरीजमधील पुढील उपग्रह रीसॅट-2बीआर2 ची लॉन्चिंगदेखील याच महिन्यात करणार आहे. त्यानंतर एजून एक सॅटेलाइट लॉन्च केले जाईल. परंतू, त्या लॉन्चिंगची तारीख अद्याप स्पष्ट नाहीये. सुरक्षा एजंसीला एक दिवसात अनेक ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी चार रिसॅटची आवश्यकता आहे. एखादे एनकाउंटर किंवा घुसखोरीच्या वेळी या चारही सॅटेलाइट उपयोगी ठरतील. 6 मार्चपर्यंत इस्रोचे 13 मिशन लाइनमध्ये आहेत. यात 6 मोठे व्हीकलचे, तर 7 सॅटेलाइट मिशन आहेत.