रक्षाबंधनाची ‘राखी’ हातालाचं असतांना पोहायला ५ भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. शुभम कुमार, नीरज कुमार, धीरज कुमार, प्रिन्स कुमार आणि अमित कुमार अशी मृतांची नावे आहेत.गावात घडलेल्या घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह ताब्यात घेतले. सर्व मुलांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी विजयंत यांनी सांगितले की, सर्व मुले गावापासून काही अंतरावर असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेली होती. आंघोळ करत असताना ही मुले चुकून खोल पाण्यात गेली आणि तिथेच बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राखी बांधल्यानंतर सर्व मुले तलावात आंघोळीसाठी गेली होती.
दरम्यान, तलावात मुले बुडाल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तात्काळ पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली.