नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून देशातील जवळपास प्रत्येक टीव्ही चॅनलला मुलाखती देणाऱ्या सीमा हैदर ने मुख्य प्रवाहातील माध्यमांपासून दूर राहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. सीमा सध्या तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या दुनियेत व्यस्त आहे, जिथून तिने असा एक खाजगी व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यावर यूजर्सकडून विचित्र प्रतिक्रिया येत आहेत. सीमा हैदरच्या नुकत्याच आलेल्या व्हिडीओबाबत असे बोलले जात आहे की, सीमाने तिचे पती सचिनसोबतचे रोमँटिक व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली आहे.
https://www.instagram.com/reel/Cuq1DgppOFB/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीमा हैदर आणि सचिनच्या या खासगी व्हिडिओमध्ये सीमा आणि सचिन एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये सीमा म्हणाली, ‘ लोकांनी कितीही रडले, कितीही आरोप केले तरी माझ्यात आणि सचिनमध्ये काहीही बदल होणार नाही. पती सचिनसोबत नेहमीच एक हिंदू महिला राहीन, असेही सीमाने सांगितले. आता सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.