पाचोरा (प्रतिनिधी) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात तारीख ६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून, माल्यार्पण करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक के.टी.भारुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला प्राचार्य संजय पवार, पर्यवेक्षक साहेबराव पाटील, प्रा. संगीता राजपूत, प्रतिभा पाटील, ज्येष्ठ शिक्षक अंबालाल पवार, निवृत्ती बाविस्कर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रतिभा परदेशी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून प्रेरणादायी विचार व्यक्त केले. प्रा के.टी. भारुळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन करून त्यांनी संघर्षातून कसे उत्तुंग यश गाठले,याबाबतची माहिती सांगितली.श्रीमती माया सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर शरद साळुंखे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.