भुसावळ – येथील एस.टी.बस स्थानकासमोर रिक्षाचालकाने बस चालकाला मारहाण केल्याची घटना दि.५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर एसटी वाहक व चालकांनी मारहाण करणार्या रिक्षाचालकास अटक करण्याच्या मागणीसाठी कर्मचार्यांनी दुपारी चक्काजाम केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आगाराचे चालक आर. एल. पाटील यांनी एसचीचा ब्रेक मारल्याचा राग आल्याने आरोपी रिक्षा चालकाने आर.एल.पाटील यांच्यासह महिला वाहकास मारहाण केली.