भुसावळ | तालुक्यातील फेकरी येथे जुन्या वादातून झालेल्या झटापटमध्ये तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मंगल शांताराम शेळके (वय २३, रा. वाल्मीक नगर,फेकरी ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव असून या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला संतोष लक्ष्मण बावस्कर या व्यक्तीने हाताला चावले होते. या लहान मुलीचा मयत मंगल शेळके हा नातेवाईक आहे. मंगलने त्यावेळी संतोष बाविस्कर याला मुलीच्या हाताला का चावला म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी मंगलने संतोष बाविस्करच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी संशयित राहुल तुकाराम पाडळे (वय २७, रा. फेकरी) याने तेथे येऊन माझ्या आत्याभावाला संतोषला कानात का मारले म्हणून विचारणा केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी मंगलला राहुलने दिली होती.
हे पण वाचाच..
५ वर्षांच्या बालिकेवर दोन अल्पवयीन मुलांनी केला आळीपाळीने अत्याचार
आजपासून हिरवी वांगी खाणे सुरू करा : फायदे जाणून व्हाल चकित
शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी ; 9च्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकही हादरले..
तेलाचा टँकर उलटल्याची बातमी कळताच लोकांची उडाली एकच झुंबड
माझ्या आतेभावाला मंगलने कानशिलात मारली होती. हा राग त्याने मनात ठेवला होता. दोन दिवसापूर्वी राहुलने मंगलला थांबवून जुना वाद उकरून काढला. यावेळी राहुल पाडळे याने मंगलला शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवर राहुलने मंगलला ढकलून् दिले. तेथे त्याच्या डोक्याला जबर् मार लागला. त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथून भुसावळ सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले.
भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत संशयित राहुल पाडळे याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला मयताचा मोठा भाऊ आकाश शांताराम शेळके (वय् २५) याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.