पुणे : देशासह राज्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून अशातच लाच प्रकरणी पुण्यात महसूल विभागात एका IAS अधिकाऱ्यावर सीबीआयने छापे टाकले आहेत डॉ. अनिल गणपतराव रामोड असं IAS अधिकाऱ्यांचं नाव असून त्यांना सीबीआयने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रामोड यांनी हायवे लगत असलेल्या जागेचा परतावा लवकर मिळावा यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत सीबीआयने छापेमारी करत अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.
आज शुक्रवारी दुपारी एसजीएस मॉलजवळ कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र, नेमक काय प्रकरण आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 8 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी अनिल रामोड यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.