जळगाव | जळगावात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच असून अशातच आणखी एक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत आणि फोटो सोशल व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. याबाबत एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एका भागात २५ वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह वास्तव्याला असून सध्या ती शिक्षण घेत आहे दरम्यान डिसेंबर २०२२ ते अद्यापपर्यंत एजाज इंद्रिस खाटीक याने तरुणीला घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला.
हे पण वाचा..
सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किमती 8 ते 12 रुपयांनी कमी होणार
पुढचे 2 दिवस जळगावात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी
रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू, 900 हून अधिक लोक जखमी
गाई-म्हशीपेक्षा शेळीचे दूध जास्त शक्तिशाली ; हे फायदे वाचून व्हाल चकित..
दरम्यान ही घटना पीडित तरुणीने घरच्यांना सांगितले नाही, परंतु अखेर मन घट्ट करत तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर शुक्रवार २ जून रोजी रात्री १० वाजता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी एजाज इंद्रिस खाटीक याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.