मुंबई । सध्या उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले असून कडाक्याचं ऊन आणि उष्णता यामुळे मान्सून कधी दाखल होणार याची वाटच लोक पाहत आहेत. शेतकऱ्यांचे डोळे देखील आता आभाळाकडे लागले आहेत. या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून अंदमान निकोबारकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे केरळमध्ये 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो आणि यामुळे राज्यातही 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असेल असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हे पण वाचा..
HSC Result : आज लागणार 12वीचा निकाल, कसा पहाल निकाल?
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! थकीत चौथा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार
शेतकऱ्यांनो सावधान..! चोपड्यात बनावट कापूस बियाण्याची पाकीटे जप्त
हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून येत्या दोन दिवसात कोकणात मान्सूनपूर्व पाऊस दाखल होणार आहे. येत्या 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व आणि 7 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
स्कायमेटचा अंदाज
तर स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून 7 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचणार आहे. दक्षिण हिंद महासागरावर चक्रीवादळ सरकत आहे. या वादळामुळे मान्सूनला उशीर होण्याची शक्यता आहे. वादळाचा प्रभाव कमी होण्यास जवळपासा आठवडा जाईल. या वादळाचा अडथळा दूर झाल्यानंतर मान्सून दाखल होईल, असं अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.