आत्तापर्यंत तुम्ही कार किंवा बाईक रिव्हर्स चालवताना पाहिलं असेल पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की ट्रेन रिव्हर्स चालली आहे तर तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. पण ते खरे आहे. हे प्रकरण वेनाड एक्स्प्रेस ट्रेनशी संबंधित आहे, जी तिरुअनंतपुरमहून शोरनूनला जात होती. जाणून घेऊया या घटनेबद्दल. ही ट्रेन चेरियानाड रेल्वे स्थानकावर मावेलिक्कारा आणि चेंगन्नूर दरम्यान काही काळ थांबली होती. पण लोको पायलटने ट्रेन पुढे नेली.
अलाप्पुझा जिल्ह्यातील चेरियानाड स्टेशनवर लोको पायलट ट्रेन थांबवायला विसरला. आपली चूक लक्षात येताच त्याने ट्रेन 700 मीटर रिव्हर्स केली आणि परत स्टेशनवर पोहोचले.
लोको पायलटने ट्रेन रिव्हर्स आणली जेणेकरून चेरियानाड येथे ज्या प्रवाशांना उतरायचे होते त्यांना खाली उतरता यावे आणि ज्यांना ट्रेन पकडायची होती त्यांना ट्रेन पकडता यावी. चेरियानाड रेल्वे मार्गावर घडलेल्या या घटनेची सध्या चर्चा होत आहे.
हे पण वाचा..
भीषण अपघाताने महाराष्ट्र पुन्हा हदरला : 8 जण ठार, 13 जण गंभीर
खळबळजनक! भुसावळ मुलाने केली आईची व पत्नीची हत्या
भारतीय पोस्टात 12828 जागांसाठी बंपर भरती ; १० वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी
मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? जाणून घ्या
मात्र, प्रवाशांकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचे रेल्वेने सांगितले. ट्रेनही वेळेवर पोहोचली. ट्रेन रिव्हर्समध्ये स्टेशनवर नेण्यासाठी 8 मिनिटे लागली.
मात्र लोको पायलटने ती वेळ कव्हर करत ट्रेन वेळेवर गंतव्यस्थानावर नेली. स्टेशनवर स्टेशन मास्टर किंवा सिग्नल नसल्यामुळे लोको पायलटकडून ही चूक झाली असावी, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही अंतर्गत बाब असून याप्रकरणी लोको पायलटकडून स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे. सध्या या घटनेबाबत रेल्वेने कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.