इंडिया पोस्टने पोस्ट ऑफिस शाखा कार्यालय (BO) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. एकूण 12828 पदांसाठी ही भरती होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवारांना 12 जून ते 14 जून 2023 या दोन दिवसांसाठी त्यात सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.
या पदांसाठी होणार भरती
ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) या पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून 10वीची परीक्षा अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून गणित आणि इंग्रजीसह उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच इतर पात्रतेबाबत बोलताना उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावे.
हे पण वाचा..
घाई करा! RBI मध्ये पदवीधरांसाठी विविध पदांवर बंपर भरती
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत IB मार्फत 797 पदांवर भरती सुरु, आजच करा अर्ज
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी भरती सुरु ; ७वी ते १० वी उत्तीर्णांना नोकरीचा चान्स
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
वेतनमान
शाखा पोस्टमास्तर (BPM) पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 12,000 ते 29,380 रुपये पगार मिळेल. सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) या पदावरील निवडलेल्या उमेदवारांना 10,000 ते 24,470 रुपये पगार मिळेल.
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
आता नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करा.
अर्ज भरण्यासाठी पुढे जा.
निर्देशानुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्जातील तपशीलांची पडताळणी करा.
अर्ज फी भरा.
आता अर्ज सबमिट करा.
अर्जाची एक प्रत सोबत ठेवा.