पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना लागली आहे. दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याबाबची विचारणा राज्य मंडळ विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे.अशातच निकालाबाबत एक मोठी बातमी समोर आलीय.
केव्हा लागणार निकाल?
राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी सध्या सुरू असून या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
हे पण वाचा..
निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली 3 लाखांची भेट! आता खात्यात पैसे येतील
सुवर्णसंधी..! ECHS मार्फत जळगाव आणि बुलडाणामध्ये नवीन भरती, आठवी ते पदवीधरांना संधी..
धक्कादायक! मंत्रीपद मिळेल, पण.. राज्यातील ६ आमदारांना घातला कोट्यवधींचा गंडा
यंदा भारतात मान्सून कधी दाखल होणार? वाचा हवामान खात्याचा अंदाज
याच दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल जाहीर होईल. तसंच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. 2 ते 25 मार्च या कालावधीत ही परीक्षा पार पडली होती. दहावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाली होती. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत 14 लाख विद्यार्थी बसले होते.