पुणे : सध्या राज्यात सूर्य आग ओकत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी काहीजण विविध पद्धत अवलंबू पाहत आहे. दरम्यान, अशातच खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी नऊ मुली पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या.या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले असून मात्र दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.
नेमकी काय आहे घटना?
बुलढाणा जिल्ह्यातील मुली पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. यावेळी त्या कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वच्या सर्व नऊ मुली पाण्यात बुडू लागल्या. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी मुलींना वाचविण्यासाठी धाव घेतली.
हे पण वाचा..
वाढत्या महागाईवर खुशखबर! 3 वर्षातील सर्वात कमी महागाई दर, या गोष्टी झाल्या स्वस्त..
अवनीत कौरच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढवला; फोटो पाहून चक्रावून जाल
एकांत ठिकाणी नेऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार ; चाळीसगाव हादरलं
चार खांदे गेले तर मी एकटा काय करू? : मंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले..
यात नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु खुशी संजय खुर्दे (वय 14 वर्ष ), शीतल भगवान टिटोरे (वय 15 वर्ष) या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला असून अद्यापही त्यांचा मृतदेह सापडला नाहीय. गोऱ्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे जवान दाखल होत आहेत.
खडकवासला परिसरात अनेक ठिकाणी घातक क्षेत्र आहे. या सगळ्या क्षेत्रात योग्य संरक्षण भिंत किंवा फलक लावण्याची गरज आहे. अनेकांचा मृत्यू होऊनही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन किंवा इतर विभागामार्फत हे अपघात किंवा दुर्घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.