Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देऊन अत्याचार ; शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा

Editorial Team by Editorial Team
May 12, 2023
in जळगाव
0
जळगाव : लघुशंकेचा बहाणा करून अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारातून पळाला, पण..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगावात  शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) आरोपी खासगी क्लासचा शिक्षक तुषार शांताराम माळी (वय ३३, रा. नशिराबाद) याला मरेपर्यंत जन्मठेप व सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. माने (गाडेकर) यांनी दिला.

आरोपी तुषार माळी याचा नशिराबाद परिसरामध्ये श्रीसमर्थ नावाचा शैक्षणिक क्लास होता. अल्पवयीन विद्यार्थिनीची इच्छा नसताना तिच्या आई-वडिलांना भेटून “तुमच्या मुलीला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा, मी तुमच्या कडून फीचे पैसे घेणार नाही”, असं माळी याने सांगितले. ऑगस्ट २०१७ पासून विद्यार्थिनी क्लासला जायला लागली. माळी हा विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचच्या एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर घरामध्ये नेऊन अत्याचार करत होता. त्याने डिसेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीमध्ये वारंवार अत्याचार केले.

पीडित विद्यार्थी शिक्षकाला विरोध करायची. मात्र, शिक्षक तिला “ही घटना कोणाला सांगितले, तर तुझ्या आई वडिलांना जीवे मारेन”, तसेच मोबाईलमध्ये पीडितेसोबत असलेले फोटो लोकांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत जबरदस्तीने पिडित विद्यार्थिनीवर अत्याचार करत होता. मात्र, मार्च २०१८ मध्ये विद्यार्थिनीचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याची बाब समोर आल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात तुषार माळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित विद्यार्थिनी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्यासमोर आलेल्या संपूर्ण पुराव्याअंती तुषार माळी याला दोषी धरून गुरूवारी मरेपर्यंत जन्मठेप आणि सव्वा लाख दंडाची शिक्षा शिक्षा सुनावली.

दंडाच्या संपूर्ण रक्कमेतून ५० टक्के रक्कम ही पीडित विद्यार्थिनीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या प्रकरणामध्ये पीडित विद्यार्थिनीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रूपये रक्कम पुर्नवसनासाठी देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. तर तपास अधिकारी म्हणून आर.एन.खरात यांनी तर पैरवी नरेंद्र मोरे, विजय पाटील, गुणवंत सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अरे बापरे! पाचोऱ्यात भरधाव पिकअपची चौघांना धडक ; पायाचे तुकडे होऊन जागीच पडले

Next Post

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी.. BSF मध्ये 247 पदांवर बंपर भरती ; असा करा अर्ज

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

12वी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी.. BSF मध्ये 247 पदांवर बंपर भरती ; असा करा अर्ज

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us