बुलडाणा : मध्य प्रदेशात काल बस नदीत कोसळून 15 हुन जास्त प्रवाशी मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना आज पहाटे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
काय आहे नेमकी घटना?
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही खासगी ट्रॅव्हल्स बस शेगाव वरून पुण्याच्या दिशेनं निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास 15 फूट खोल नदीत ही बस कोसळली
या बसमधून अंदाजे तीस प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
















