जळगाव,(प्रतिनिधी)- महिला बेछुटपणे चाकूने पुरुषावर वार करत असल्याचा व दोघांमधील वादाचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असतांना आज एम. आय. डी. सी. पोलिसांनी महीला व पुरुषावर कारवाई केली आहे.
सविस्तर असे की,काल दिनांक 07/05/2023 रोजी हॉटेल महींद्रा चे समोर अजिंठा चौफुली जळगाव येथे दुपारी 03.00 वा चे सुमारास एक महीला आणी एक पुरुष असे एकमेकास शिवीगाळ करुन मोठ्यामोठयाने आरडाओरड भांडण करत असल्याबाबतचा व्हीडीओ सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला होता. त्याप्रमाणे भांडण करणारे पुरुष व महीला हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास न आल्याने त्याचे बाबत माहीती काढण्याचे काम सुरु होते.
त्यप्रमाणे एमआयडीसी पोलीसांनी भांडण करणारे महीला व इसमाचा शोध घेतला असुन त्यांचे नावे माधुरी सागर राजगिरे व ईसमाचे नांव सांगर भिकन राजगिरे दोन्ही रा रामेश्वर कॉलनी जळगाव असे असल्याचे निष्पन्न झाले आहे दोन्ही पती पत्नी असुन कौटुंबीक वादातुन त्यांचा वाद झाला होता. त्यांचेविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन ला भादवी कलम 160 मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही मा. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली सफौ अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील मपोका मिनाक्षी घेठे अशांनी केली आहे.
















