भुसावळ : महावितरणने वीज बिलांसोबत ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिलही दिले आहे. यातून एकट्या भुसावळ तालुक्यातून लाखो रुपये वीज ग्राहकांच्या खिशातून वसूल केले जाणार आहेत. अगोदरचं महागाईने सामान्य ग्राहक होरपळत आहेत. भरमसाठ वीजबिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच महावितरणने ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ‘शॉक’ दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहक हवालदिल झाले असून ठेवीचे पैसे भरायचे कोठून हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रात वीज दर जास्त
देशात दिल्ली सरकारतर्फे वीज ग्राहकांना २०० युनिट वीज मोफत दिली जाते. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, केरळ आदी राज्यात ग्राहकांना २ ते २.५० रुपये प्रति युनिट दराने वीज पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात मात्र १०० युनिटपर्यंत ४.४१ रुपये, १०० ते ३०० युनिट ९.६४ रुपये व ३०१ ते ५०० युनिटपर्यंत १३.६१ रुपये प्रति युनिट दराने विजेचे बिल आकारण्यात येते. या बिलात वीज शुल्क, वीज कर, वीज वाहन कर, इंधन अधिभार आदी शुल्क आकारणी केली जाते. त्यामुळे वीज ग्राहकास ७०० रुपये बिल आले असेल तर ५०० रुपये इतर कर मिळवून १२०० रुपये भरावे लागतात. महावितरण कंपनीतर्फे नवीन संगणकीय मीटर फास्ट असल्यामुळे वीज ग्राहकाने विजेचा वापर कमी केला तरी मीटरमध्ये दुप्पट युनिटचा वापर केल्याचे रीडिंग दर्शविते. त्यामुळे वीज ग्राहकांना वाजवीपेक्षा जास्त वीज बिलाचा भरणा करावा लागतो, अशी ओरड सुरु आहे.
हे पण वाचा..
पाचोर्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ जणांकडुन अत्याचार ; ७ तरूणांसह तिन संशयित ताब्यात
शाळकरी मुलीची चक्क साडेतीन हजाराला विक्री, लॉजवर नेऊन केला बलात्कार
शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; मान्सूनबाबत आली मोठी अपडेट, घ्या जाणून
सुरक्षा ठेवीची बिले तत्काळ मागे घ्या
महावितरण कंपनीतर्फे वीज ग्राहकांना एप्रिलच्या वीज बिलासोबत ५० रुपयांपासून तर ५ हजार ते १० हजार रुपये पर्यंतचे सिक्युरिटी डिपॉझीट भरण्याचे वेगळे बिल पाठविल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संकटकाळात महावितरणने दिलेली अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले ही सामान्य जनतेचा खिसा कापणारी आहेत. ही बिले तत्काळ मागे घ्यावी अशी मागणी प्रा.धिरज पाटील यांनी केली आहे.