मुंबई : राज्यात एकीकडे अवकाळीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात आला आहे. त्यात दुसरीकडे आता एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे
जागतिक हवामान संघटनेकडून भारतातील मोसमी पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार दक्षिण आशियाच्या बहुतांश भागांमध्ये हा पाऊस सरासरी किंवा त्याहून कमी होईल.
यात यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली होती. जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव राहणार असून त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या मान्सून अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी हवामान विभागाचा नेमका काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज सोमवारी स्कायमेटनं वर्तवला होता. मात्र, आता हवामान तज्ज्ञांनी एक चिंता व्यक्त केली आहे.