जळगाव(प्रतिनिधी)-जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून येत्या 28 एप्रिल 2023 रोजी मतदान होत असून हमाल-मापाडी तोलारी मतदार संघात तब्बल 600 च्या वर मतदार बोगस असल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार देवेन मन्नू सोनवणे, धुडकू सपकाळे, यांनी केला असून त्याबाबतची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना आज दि.26 एप्रिल रोजी दिली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हमाल मापाडी तोलारी मतदार संघात एकूण 886 मतदार असून यामध्ये 600 च्यावर बोगस व बनावट मतदार आहेत.जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एका विशिष्ट एका गटाला फायदा व्हावा म्हणून बोगस नावे समाविष्ट करून बोगस नाव समाविष्ट करून बनावट मतदार दाखविण्यात आले आहे.
वारंवार तक्रारी मात्र कारवाई नाहीच…
हमाल मापाडी तोलारी मतदार संघात बोगस मतदार असल्याबाबत धुडकू सपकाळे यांनी मतदार यादी प्रकाशित होण्यापूर्वी देखील वारंवार जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे दि. 14 /10/2021 रोजी व 18/ 11-/2021 रोजी तक्रारी केलेल्या होत्या मात्र याबाबत ठोस कारवाई केली नाही. त्याच बरोबर बोगस मतदारांची नावे असलेला तक्रार अर्ज दि- 10- 04 – 2023 रोजी दिला होता त्या अर्जावर जिल्हा उपनिबंधक यांनी कोणतीही चौकशी नकरता एकतर्फी निकाली काढला यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची उदासीनता दिसून येते हमाल मापाडी तोलारी मतदार यादीमध्ये ‘हमाल मापाडी तोलारी काम करत नसलेल्या लोकांची नावे असल्यामुळे खऱ्या कामगारांवर अन्याय होत आहे.
प्रचारादरम्यान बोगस मतदार उघड…
अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे हे निवडणूक दरम्यान प्रचार व मतदारांना भेटीगाठी दरम्यान पुनगव, विदगाव, आसोदा, सुप्रीम कॉलनी, नशिराबाद, म्हासावद येथील मतदारांच्या पत्यावर गेले असता मतदार नाहीच म्हणजेच मतदार गायब असल्याचे दिसून आले त्याबाबत त्या गावच्या सरपंच याना देखील विचारणा केली असता मतदार यादीत असलेल्या बोगस मतदार गावात नसल्याचे समजले आणि त्यांनी तसे लेखी लिहून दिले आहे.
निवडणूक स्थगित करा…
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या हमाल मापाडी तोलारी मतदार संघात तबाबल 600 च्यावर बोगस मतदार नोंदवण्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी व निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी आज करण्यात आली आहे.कायदेशीर कारवाई न झाल्यास न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे देवेन सोनवणे, धुडकू सपकाळे,संजय सपकाळे यांनी सांगितले.