पाचोरा (प्रतिनिधी) – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागा विक्रीच्या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पाचोरा तालुका भाजपाचे अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांचा पर्दाफाश येत्या 24 तारखेला करणार असल्याचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांनी आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी अमोल शिंदे पुढे म्हणाले की आमदार किशोर पाटील हे खोटे पण रेटून बोलतात वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा विक्री प्रक्रिया आजी-माजी आमदार यांच्या नेतृत्वात असलेल्या संचालक मंडळाने केलेली आहे जागा विक्रीला जबाबदार आजी-माजी आमदार आहे आमदार किशोर पाटील आरोप करतात कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाळीस हजार स्केअर फुट जागा अमोल शिंदेने घेतली परंतु प्रत्यक्षात जागा 28 हजार स्केअर फुट आहे या संदर्भात 2014 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिली त्यावेळी सभापती एन सी पाटील होते नेतृत्व माजी आमदार दिलीप वाघ यांचे होते लिलावात बोलली बोलण्यासाठी माझ्यासह पाच ते सहा व्यक्ती होत्या त्यामध्ये आमदार किशोर पाटील यांचाही एक माणूस लिलाव बोली प्रक्रियेत सहभागी होता मी त्या लिलाव प्रक्रियेत मी सर्वात जास्त बोली बोलल्यामुळे मला कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा मिळाली तत्कालीन सभापती स्वर्गीय दिनकर देवरे होते कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा का विकली गेली दिनांक 31 3 2018 रोजी जळगाव पीपल बँकेकडून कृषी उत्पन्न बाजार समितीने साडेचार कोटी रुपये कर्ज काढले परंतु तत्कालीन संचालक मंडळाने कर्ज न फेडल्यामुळे त्यांना ही जागा विकावी लागली या सर्व जागा विक्री ला आजी माजी आमदार जबाबदार आहेत आमदार किशोर पाटील यांनी आपल्या लेटरहेड वर प्रशासक नियुक्ती केली मुख्य प्रशासक म्हणून माजी आमदार दिलीप वाघ केली प्रशासक मंडळाच्या काळात रात्रीच्या रात्री मुतारी पाहून दोन गाळे बांधले आणि लाखो रुपयांना प्रशासक मंडळाने विकले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाड्यांच्या मागची जागा सुद्धा आजी-माजी आमदारांनी संगनमताने विकल्या शेतकी संघाची जागा विकली जात आहे भडगाव कॉटन सेल ची जागा विकली गेली आमदार किशोर पाटील यांची सत्तेची मस्ती आणि धुंद अजून उतरले नाही आमदारांनी शिवसेनेची गद्दारी केली स्वर्गीय आरोपांची गद्दारी केली त्यांच्यावर खोके त्याचा आरोप होत आहे आमदारांनी माझ्यावर केलेल्या आरोपाची पुरावे द्यावे मी कुठेही आरोपाच्या संदर्भात यायला तयार आहे आमदारांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे पाचोरा शहरातील भूखंड कोणी घेतले मी पुरावासह सिद्ध करून दाखवणार या संदर्भात दूध का दूध पाणी का पाणी मी करणार आहे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलचा पराभव निश्चित होणार असुन तिन नंबर वर त्यांचे पॅनल रहाणार आहे असे सुचक व्यक्तव अमोल शिंदे यांनी केले.
आमच्या शेतकरी सरकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा निवडून येणार आहे म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यांची सिटी आम्ही बंद करणार आणि आमची सिटी पुढील काळात वाजणार असे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सत्कार परिषदेला माजी सभापती सतीश शिंदे भाजप तालुका अध्यक्ष अमोल शिंदे शहराध्यक्ष रमेश वाणी भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील कैलास चौधरी गोविंद शेलार प्रदीप पाटील एडवोकेट विश्वासराव भोसले जगदीश तेली भरत पाटील मुकेश पाटील ज्ञानेश्वर सोनार भैया ठाकूर ईश्वर पाटील सोमनाथ पाटील परेश पाटील दिलीप पाटील भास्कर पाटील त्यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते