मुंबई : दुसऱ्या महिलेशी लग्न करता यावे म्हणून एका नराधम बापानेच आपल्या २ वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या माहिम परिसरातून समोर आलीय. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी रहमत अली अन्सारी (वय २२ वर्ष) याला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी (१९ एप्रिल) पहाटेच्या सुमारास माहिम येथील लिंक रोड परिसरात एका २ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आढळून आला होता. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये या मुलाचा मृतदेह गुंडाळून रस्त्यालगत टाकण्यात आला होता. या मुलाच्या तोंडाला फेस आला होता. तसंच त्याचे डोकं आणि उजव्या मनगटाला उंदरांनी चावा घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
या मुलाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा पोलिसांना मृत मुलाचे नाव अन्सारी असल्याचं समजलं. पोलिसांनी या मुलाचे वडिल रहमत अली अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली.
हे पण वाचाच..
तुमचे बँक खाते सहकारी बँकेत आहे का? RBI ने रद्द केले 8 बँकांचे परवाने
दिलासा नाहीच! मोदी आडनाव प्रकरणी न्यायालयाचा राहुल गांधींना झटका
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय : शेतकऱ्यांसह दिव्यांगाबाबत..
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर..! जळगाव जिल्हा परिषदेत लवकरच 612 पदांसाठी भरती
तेव्हा आपणच मुलाची हत्या केल्याचं त्याने चौकशीत कबूल केलं. आरोपीने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबध होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, पत्नी आणि मुलाचा त्याग करण्याची गळ या तरुणीने अन्सारी याच्याकडे घातली.
तेव्हा आरोपी रहमत अलीने २ वर्षाच्या मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलाला घराजवळील गोडाऊनमध्ये नेऊन गळा दाबून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भा दं वि ३०२ (हत्या), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३६४(अपहरण) कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.