
पाचोरा प्रतिनिधी : वेरुळी खु ता.पाचोरा येथील सरपंच मनीषा शरद पाटील यांचे अकस्मात निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेची निवड आज दि.२५ रोजी सोमवारी बिनविरोध निवड संदीप भास्कर पाटील यांची झालेली असून शिवसेना कार्यालय,पाचोरा येथे सत्कार अरुण पाटील, गणेश पाटील, यांच्या हस्ते करण्यात आला. तथा प्रमिलाबाई देविदास पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी पदमसिंग पाटील,शरद पाटील,पंढरीआण्णा पाटील, भगवान पाटील,शंकर पाटील, दत्तू पाटील,भीमराव पाटील,ईशवर पाटील,छबीलाल पाटील, बाळू पाटील, शामलाल पाटील,दिलीप पाटील,नारायण पाटील,ज्ञानेशवर पाटील,बाळू पाटील,पांडुरंग पाटील,सुनील नाईक,आदी मान्यवर उपस्थित होते. बिनविरोध झाल्यामुळे सर्वच गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत आहेत. नाना वाघ यांनी सूत्र संचालन केले.














