चौघांना अटक ; ५ गुरे दगावली ; एलसीबीची कारवाई
जळगाव – वरणगाव शहरातील इमाम कॉलनी भागात एका ट्रकमध्ये ६७ गुरे कोंबून त्यांना कत्तलीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून ६७ गुरांपैकी ५ गुरांचा मृत्यू झाला आहे . हि कारवाई एलसीबीच्या पथकाने केली.
याबाबत माहिती अशी कि , एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना वारंगावातील इमाम कॉलनी भागात एका ट्रॅकमध्ये मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये ट्रक उभा असून त्यामध्ये बेकायदेशीररीत्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशातील ६७ गुरे कोंबून आणलेली आहेत अशी माहिती मिळाली . त्यानुसार पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी उपविभागीय अधिकारी संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम , सपोनि सागर शिंपी , सपोनि सारिका कोडापे , पोहेकॉ अनिल इंगळे, रवींद्र गिरासे, सुनील दामोदर, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, संतोष मायकल , रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, किरण चौधरी, यांच्या पथकाने कारवाई केली .
यात इमाम कॉलनी भागात राहणारे शेख वसीम शेख यासिन, बशीर कुरेशी उर्फ चड्ढा यांच्या मालकीचे शेडमध्ये शेख वासिम शेख यासिन , बशीर कुरेशी दोन्ही राहणार वरणगाव यांनी जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना ट्रक क्रमांक एमएच १८-बीजी -०३१५ हिच्यावरील ड्रायव्हर व ट्रकचा मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन रा. उज्जेन ह.मू . वडजाई रोड धुळे यांच्या मदतीने ट्रकच्या बॉडीमध्ये ६७ गोऱ्हे वाहतुकी दरम्यान उठू नये यासाठी त्यांच्या पायाला आणि मानेला दोरी बांधली होती . अत्यंत क्रूरतेने गोऱ्हे बांधण्यात आले होते. यातील ५ गोऱ्हे मरण पावले . शेख वसीम शेख यासिन, बशीर कुरेशी उर्फ चड्ढा, ड्रायव्हर आणि मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन रा. उज्जेन ह.मू . वडजाई रोड धुळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.