नेपाळमधील पोखरा येथे विमान दुर्घटना घडली आहे. विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ विमान क्रॅश होण्यापूर्वीचा आहे. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान कोसळले. धावपट्टीच्या काही मीटर आधी विमान कोसळले. हा व्हिडिओ धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये दुरून येणारे विमान झुकताना दिसत आहे. या अपघातात 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
नेपाळ विमान अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला
नेपाळ एव्हिएशन अथॉरिटीच्या वतीने पश्चिम नेपाळमधील पोखरामध्ये विमान कोसळल्याचे सांगण्यात आले. या अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो बचाव कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. टेकडी दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
Yeti Airlines???????? aircraft carrying 72 passengers crashed near Pokhara international airport. Details awaited.
Video: from Nepal media of what is the plane’s final moments. pic.twitter.com/FqRtORFiAJ
— Dinakar Peri (@dperi84) January 15, 2023
विमान अपघाताबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी पोखरा घटनेवर शोक व्यक्त केला आहे. काठमांडूहून पोखरा येथे प्रवाशांसह जात असलेल्या यति एअरलाइन्सच्या एएनसी एटीआर ७२ च्या अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे, असे त्यांनी ट्विट केले आहे. मी सुरक्षा कर्मचारी, नेपाळ सरकारच्या सर्व एजन्सी आणि सामान्य जनतेला प्रभावी बचाव सुरू करण्याचे आवाहन करतो.
विमानात 10 परदेशी नागरिक होते
त्याचवेळी, यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन यांनी सांगितले की, ट्विन इंजिन एटीआर 72 विमानात 72 लोक होते. यामध्ये दोन नवजात बालके, 4 क्रू मेंबर आणि 10 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथक मदतकार्यात गुंतले आहे.