जळगाव : राज्यभरात अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर माता आणि बंळतीण महिलांना पोषण आहार पुरवला जातो. मात्र, जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथे अंगणवाडी मार्फत देण्यात येणाऱ्या सिल बंद शालेय पोषण आहारात मृत पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
गरोदर माता आणि अंगणवाडीतील मुलांना हा पोषण आहार दिला जाणार होता. मात्र, आसोदा येथे अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.
एका लाभार्थ्याला देण्यात आलेल्या पोषण आहारात बंद पाकिटात ही पाल आढळली आहे. याप्रकरणी संबंधित लाभार्थ्यांने जिल्हा परिषद व अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने हरभरा व मुगाच्या डाळीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने ही या प्रकरणी पुरवठा दराची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी दिली आहे.
हे पण वाचा..
गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला
लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?
संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना
दरम्यान, थेट सिल बंद पाकिटात मृत पाल सापडली आहे. हा खूप संतापजनक प्रकार असून गरोदर माता आणि तिच्या बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून या संदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. पाकिटांमध्ये धान्य भरताना ही मृत पाल दिसली नाही का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.














