नागपूर : आपल्या कामाच्या धडाक्यांने आणि विकासाभिमुख राजकारणाने कायम चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन आलेले आहेत. आम्हाला खंडणी द्या नाहीतर तुमच्या जीवाचं काही खरं नाही, असं त्यांना फोनवरुन सांगण्यात आलं. गडकरींच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.
नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळ नितीन गडकरी यांचं संपर्क कार्यालय आहे. आज सकाळपासून तीन वेळा गडकरी यांच्या कार्यालयात दाऊदच्या नावाने फोन आले. साडे अकरा वाजता दोन फोन आणि १२ वाजून ३२ मिनिटांनी गडकरींना जीवे मारण्याची धमकी संबंधित फोनमधून देण्यात आली. यावेळी फोन करणाऱ्याने खंडणीची मागणी केली. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा..
लयभारी! ज्येष्ठ नागरिकांना आता ST ने मोफत देवदर्शन घेता येणार ; शिंदे सरकरचा नेमका काय प्लॅन?
संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. स्थानिक पोलिसांसह अँटी टेररिझम स्क्वाड अर्थात एटीएसची टीमदेखील नागपुरात दाखल झाली आहे.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशताद्यांकडून हल्ल्याचा कट असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेण्यात आलंय.