मुंबई,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री नितीन गडकरी हे राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होतांना दिसत असतांना अखेर नितीन गडकरी यांनी स्वतःच या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
नितीन गडकरी मोदी सरकार मध्ये मंत्री असतांना भाजपच्या संसदीय बोर्डाच्या कार्यकारणीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यानंतर अनेकांना याचा धाक्काचं बसला होता दरम्यान गडकरी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या.अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा समोर येतं होत्या मात्र, त्यानंतर आता गडकरींनी स्वतः आगामी निवडणुकींबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, सुरु अनेक चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मुंबईतील अंधेरी येथील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
काय म्हणाले नितीनी गडकरी…
गडकरी म्हणाले की, मतदार ज्यांना निवडून द्यायच त्यांना निवडून देतात. सामान्यांना चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती हव्या असून, मी कधीच कोणाच्या गळ्यात हार घातला नाही असे सांगत ते म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत कटआउट, कार्यकर्त्यांना चहापाणी आणि पोस्टरही लावणार नाही असा निश्चय केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचे आहे, तर द्या नाहीतर नका देऊ. मात्र, त्यानंतरही लोकं मला मत देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सामान्यांना कामं करणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत असेदेखील गडकरींनी म्हटले आहे.