Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in राष्ट्रीय
0
पवार, ठाकरे, पटेल पहिल्यांदाच एकत्र; नेहरू सेंटरमध्ये खलबतं सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी दरम्यान सुरू असलेलं बैठका आणि भेटीगाठींचं सत्रं आजही सुरूच आहे. आता वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये तिन्ही पक्षांची बैठक सुरू असून या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत. राज्यातील सत्तापेचावर या बैठकीत आजच अंतिम फैसला होणार असल्याने राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. 

शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर काल रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत रात्री उशिरा शरद पवार यांची भेट घेतली होती. काल रात्री ११ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री सव्वा बारा वाजता संपली होती. त्यानंतर आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी ७५ मिनिटं शिवसेना आमदारांशी संवाद साधला होता. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची हॉटेल ‘द ललित’मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच दिवसांसाठी हे हॉटेल बुक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आमदारांना मुंबई आणि हॉटेलबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर आज दुपारी वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून सत्ता सूत्रावर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मित्रपक्षांसोबत बैठक !

Next Post

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा तर नाशिकच्या महापौरपदी भाजपचा विजय

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा तर नाशिकच्या महापौरपदी भाजपचा विजय

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचा तर नाशिकच्या महापौरपदी भाजपचा विजय

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us