नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याने तरुणाने तरुणीवर सपासप वार केल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या आदर्शनगर भागात ही घटना घडली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी तरुणीला रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सुखविंदर असे आरोपीचे नाव असून त्याला हरियाणातील अंबाला येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नेमकी काय आहे घटना?
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी सिमरजित ही दिल्ली विद्यापीठात बी.ए.चे शिक्षण घेत होती; 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरशी मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच मुलीने स्वतः हून सुखविंदरपासून लांब राहायला सुरूवात केली. मात्र या गोष्टीचा सुखविंदरला राग आला होता. याच रागात त्याने मुलीवर हल्ला केला.
After break-up, jilted lover stabs girlfriend multiple times in broad daylight in Adarsh Nagar, Delhi; shocking video surfaces👇#Delhi #India #Crime #Woman #Breakup #Shocking #BREAKING #Indianews #delhinews pic.twitter.com/YuLbz50tVl
— Free Press Journal (@fpjindia) January 4, 2023
सोमवारी त्याने पीडित मुलीला ब्रेकअपचे कारण जाणून घ्यायचे असल्याचे सांगत भेटायला बोलावले. यावेळी त्याने मुलीवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या बाबू जगजीवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीटीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये सुखविंदर मुलीवर हल्ला करताना करताना दिसत आहे. मुलीच्या मानेवर, पोटावर आणि हातावर अनेक जखमा झाल्याचेही पाहायला मिळत आहे. हल्ला केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील शेजाऱ्यांनी गोंधळ ऐकून सिमरजितच्या मदतीसाठी धाव घेतली.