रायगड : सध्या अपघाताच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातच काळजाचा ठोका चुकवणारा एक अपघात समोर आला आहे. रधाव वेगात येणाऱ्या एका कारने दुचाकीस्वासह दोन शाळकरी मुलींना जोरदार धडक दिली. ही घटना रायगड जिल्ह्यातील पाली शहरात घडली आहे.
दैववलवत्तर म्हणून दोन्ही शाळकरी मुली आणि दुचाकीस्वार किरकोळ दुखापत होऊन बचावला. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे. वाहतुकीचे नियम तोडत कार वनवेमध्ये घुसुन हा अपघात झाला.
भरधाव कारने दुचाकी आणि दोन शाळकरी मुलींना उडविले, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटिव्हीमध्ये कैद#Raigad #Accident #Police #ViralVideo #Police pic.twitter.com/8IvGN6Eolp
— Satish Daud Patil (@Satish_Daud) December 28, 2022
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन शाळकरी मुली रस्त्याच्या कडेनं जात आहेत. त्यानंतर एक दुचाकीस्वार आपली दुचाकी घेऊन रस्ता ओलांडताना दिसत आहे. यादरम्यान, समोरुन भरधाव वेगात येणारी एक कार शाळकरी मुलींसह या दुचाकीस्वाराला जोराची धडक देते. धडक बसताच, मुली रस्त्याच्या बाजूला फेकल्या जातात.
तर कार दुचाकीस्वाराला पाच ते दहा फूट फरफटत नेते. नशीब बलवंत्तर म्हणून हा दुचाकीस्वार कारच्या चाकाखाली येण्यापासून थोडक्यात बचावतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा अपघात CCTV मध्ये कैद झाला आहे. वाहतुकीचे नियम तोडत कार वनवेमध्ये घुसून हा अपघात झाला.