जळगाव,(प्रतिनिधी)- शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलावर टूव्हीलर गाडी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन मित्र चारचाकी वाहनाखाली आल्याने चिराडल्या गेले या घटनेत दोघे मित्र ठार झाले असून ही घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. मयूर विठ्ठल लंके- साळुंखे (वय १९, रा. पथराड, ता. धरणगाव) व दीपक समाधान पाटील (वय २१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
गुजराल पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलावर अचानक दुभाजकावर दुचाकी आदळल्यानंतर दोघे दुसऱ्या चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आले. यात मयूर याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अत्यंत महत्वाची बातमी???????? वाचा …