हैदराबाद : तुम्ही आतापर्यंत अपघाताचे अनेक व्हिडिओ पहिले असतील. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये भरधाव ट्रकची दोरी एका बाईकस्वाराच्या गळ्यात अडकून त्याचा अपघात झाला आहे.
काय घडले नेमके?
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, समोरून एक ट्रक येताना दिसत आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने त्याचवेळी एक बाईकस्वार येतो. ट्रकला बांधलेली दोरी सुटते आणि ती खाली लटकते. त्याचवेळी ट्रकमधील सामान रस्त्यावर पडते. यावेळी ट्रकच्या बाजूने एक बाईकस्वार जात असतो. त्यादरम्यान ट्रकला लटकणारी दोरी अचानक बाईकस्वाराच्या गळ्यात अडकते. यानंतर ट्रक पुढे निघून जातो आणि तो बाईकस्वार दोरीसकट मागे खेचला जातो.
ड्रायव्हिंग करताना अचानक लागला फास अन्… pic.twitter.com/wGBLpulHaO
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 15, 2022
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हि संपूर्ण घटना कैद झाली आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.