नाशिक : नाशिक-सिन्नर महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्याजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे. या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला आहे.
https://twitter.com/kirantajne/status/1600764997902413824
नाशिकमध्ये पुन्हा बसला आग लागून त्यात प्रवाशांचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या नाशिकमध्ये भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर शहरातील ब्लॅक स्पॉट ठरवून तिथे तात्काळ कारवाई कारवाई सुरू झाली होती.