विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या उपकरणांवर प्रात्याक्षिके बघण्याची मिळणार संधी
जळगाव – दहावी, बारावी व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या जे विद्यार्थी अभियांत्रीकी पदविका (डिप्लोमा) व औषध निर्माण पदविका (डी.फार्मसी) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित आहे. अशा विद्यार्थ्यांकरिता शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे शनिवार, 15 जून, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता करिअर फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. एम. व्ही. इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई या विभागांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या दहावी व बारावी परिक्षांच्या निकालाच्या अनुषंगाने विविध शाखांच्या पदविका अभ्यासक्रांची प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने सुरू झालेली आहे. जे विद्यार्थी सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशा संबंधीच्या प्रश्नांचे निराकरण व त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ऑनलाईन प्रवेशाची नोंदणी, त्यातील नियम, आवश्यक कागदपत्रे, डिप्लोमा करण्याचे फायदे, त्यातील उपलब्ध नोकरीच्या व उद्योग निर्मितीच्या संधी आदि महत्वपुर्ण बाबींवर तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांना संस्थेतील विविध विभागांच्या प्रयोगशाळेत उपलब्ध असणाऱ्या उपकरणांवर प्रात्याक्षिके बघण्याची संधी मिळणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पी. पी. चौधरी यांचेशी मोबाईल क्र. 9309188385 वर संपर्क साधावा. कार्यक्रमाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावर ड्राईंग हॉल नं 4 मध्ये जमावे. असे आवाहन डॉ. एम. व्ही. इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.