मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला. या कार्यक्रम सोहळ्यात बोलताना कोश्यारी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते तर नितीन गडकरी हे आधुनिक काळातील आदर्श आहेत. गडकरींनी देशात चांगले रस्ते बनवले आहेत. लोक तर आता त्यांना गडकरी ऐवजी रोडकरी म्हणू लागले आहेत. गडकरींची स्तुती करताना राज्यपाल शिवाजी महाराजांना मात्र जुने आदर्श असे बोलून गेले आणि विरोधकांना आयते कोलीत मिळाल.
हे पण वाचा …
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना
Post Office : पोस्टाची ‘ही’ योजना आहे खूप खास ; 100 रुपयांची बचत करून मिळेल मोठा नफा
आता युवासेनेला मोठं खिंडार ; 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
राज्यपालांच्या विधानानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही तर आहेतच पण शिवद्रोही सुद्धा आहेत. एकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगातील गडकिल्ल्यांवर फिरा मग कळेल शिवाजी महाराज कोण होते …. उगीच उठायचं आणि टाळाला हे धंदे बंद करा असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने टीकेचे धनी बनतात. यापूर्वी देखील त्यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत, तसेच सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्याबाबत बोलतानाही राज्यपालांची जीभ घसरली होती, त्यानंतर कोश्यारी नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कोश्यारी यांना केंद्राने परत बोलवून घ्यावे अशी मागणीही विरोधकांनी यापूर्वी केली होती. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.