औरंगाबाद : राज्य असो किंवा देश पातळीवरील कोणताही राजकीय मुद्दा असो आपल्या वक्तव्याने नेहमी खळबळ उडवून देणारे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी चक्क नोटा उधळल्या आहेत. जलील यांच्यावर नोटा उधळत डान्स करत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. आता तोच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाहा व्हिडिओ :
औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्या, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/aNW2jMmM3E
— News18Lokmat (@News18lokmat) November 19, 2022